February 2, 2026 3:17 pm

Home » मुखपृष्ठ » सिंधुदुर्ग कसाल येथे भरधाव कार अपघातात महिलेचा मृत्यू

सिंधुदुर्ग कसाल येथे भरधाव कार अपघातात महिलेचा मृत्यू

सावंतवाडी: मुंबई-गोवा महामार्गावर कसाल येथील खालसा धाब्यासमोर भरधाव वेगाने जाणाऱ्या एर्टिगा कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला. मात्र, तिचे अपंग पती, चार महिन्यांची मुलगी आणि साडेतीन वर्षांचा मुलगा सुदैवाने बचावले. ही घटना आज सोमवारी दुपारी घडली.
शमिका शशांक पवार (वय २७) असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांचे पती शशांक प्रकाश पवार (वय ४०), मुलगी पवित्रा आणि मुलगा प्रभास हे या अपघातातून बचावले आहेत. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एर्टिगा कार चालकाचे नाव राहुल शर्मा असे असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

या अपघाताची अधिक माहिती अशी की, पवार कुटुंबीय आपल्या सुझुकी मोपेडवरून कणकवलीच्या दिशेने जात होते. त्याचवेळी त्यांनी महामार्गावर अचानक लेन बदलण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या एर्टिगा कारने त्यांच्या मोपेडला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, मोपेडच्या मागे बसलेल्या शमिका पवार रस्त्यावर आपटल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Facebook
X
WhatsApp
Email
Telegram

‘लक्ष्मी निवास’ आधी प्रसाद-अमृताने ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ मालिकेत केलेलं एकत्र काम, १० वर्षांपूर्वीची आठवण केली शेअर

Prasad Jawade And Amruta Deshmukh : अभिनेता प्रसाद जवादे व अमृता देशमुख मराठीतील लोकप्रिय सेलिब्रिटी कपलपैकी एक आहे. प्रसाद ‘पारू’ मालिकेत मुख्य नायकाची भूमिका साकारत आहे तर अमृता नाटक, मालिकांमध्ये काम करत असते. आता हे दोघे ‘पारू’ व ‘लक्ष्मी निवास’च्या महासंगमनिमित्त एकत्र काम करणार आहेत. अशातच या जोडीने यापूर्वी त्यांनी पहिल्यांदा कधी एकत्र काम केलं