February 2, 2026 4:36 pm

Home » मुखपृष्ठ » भीतीदायी घसरणीनंतर शेअर बाजाराचा मूडपालट; गुंतवणूकदारांसाठी दिलासादायी ‘सेन्सेक्स’ची फेरउसळी कशामुळे?

भीतीदायी घसरणीनंतर शेअर बाजाराचा मूडपालट; गुंतवणूकदारांसाठी दिलासादायी ‘सेन्सेक्स’ची फेरउसळी कशामुळे?

मुंबई: जागतिक बाजारपेठेतील मजबूत कल आणि त्याला अनुसरून धातू, वस्तू आणि वाहन क्षेत्रातील समभागांमध्ये झालेल्या खरेदीमुळे भांडवली बाजाराचा सप्ताहारंभ सकारात्मक राहिला. गुंतवणूकदारांच्या खरेदीला अनुकूल मूड पालटल्याने सोमवारी सेन्सेक्स ४१९ अंशांनी वधारून, ८१,००० च्या पातळीवर बंद झाला. अलीकडच्या दिवसांमधील भीतीदायी घसरणीनंतर गुंतवणूकदारांना हा मोठा दिलासाच आहे.
गत सप्ताहातील सलग दोन दिवसांची घसरण मोडून काढत, सेन्सेक्स ४१८.८१ अंशांनी (०.५२ टक्के) वाढून ८१,०१८.७२ पातळीवर दिवसअखेरीस स्थिरावला. बाजारात खरेदीचा जोरदार बहर होता, याचा प्रत्यय म्हणजे सेन्सेक्समधील ३० पैकी २६ समभाग वधारले आणि केवळ चार घसरणीत राहिले. दिवसभरात, सेन्सेक्स ४९३.२८ अंशांनी उसळला होता आणि दिवसअखेर त्यांनी उच्चांकी पातळीनजीकच विश्राम घेतल्याचे दिसून आले. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १५७.४० अंशांनी ०.६४ टक्के वधारून २४,७२२.७५ वर बंद झाला. या निर्देशांकानेही सत्रांतर्गत १६९.३ अंशांचा उच्चांक गाठणारी कमाई, सत्राच्या समाप्तीपर्यंत जवळपास टिकवून ठेवली.

Facebook
X
WhatsApp
Email
Telegram

‘लक्ष्मी निवास’ आधी प्रसाद-अमृताने ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ मालिकेत केलेलं एकत्र काम, १० वर्षांपूर्वीची आठवण केली शेअर

Prasad Jawade And Amruta Deshmukh : अभिनेता प्रसाद जवादे व अमृता देशमुख मराठीतील लोकप्रिय सेलिब्रिटी कपलपैकी एक आहे. प्रसाद ‘पारू’ मालिकेत मुख्य नायकाची भूमिका साकारत आहे तर अमृता नाटक, मालिकांमध्ये काम करत असते. आता हे दोघे ‘पारू’ व ‘लक्ष्मी निवास’च्या महासंगमनिमित्त एकत्र काम करणार आहेत. अशातच या जोडीने यापूर्वी त्यांनी पहिल्यांदा कधी एकत्र काम केलं